

पुढारी ऑनलाइन डेस्क : ठाण्यात रिक्षा आणि कारच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बुधवारी रात्री घडला. याप्रकरणी राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर काल रात्री कारने दोन रिक्षा आणि कारला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. यात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
हे ही वाचा :