Ice-creame : तब्बल 63 हजार रुपयांचे आइस्क्रीम! | पुढारी

Ice-creame : तब्बल 63 हजार रुपयांचे आइस्क्रीम!

दुबई : उन्हाळा आला की अनेकांच्या जिभेला आइस्क्रीमची ओढ लागते. जगभर आइस्क्रीमप्रेमींची संख्या कमी नाही आणि आइस्क्रीमचेही तितकेच असंख्य प्रकार आहेत. अर्थातच या आइस्क्रीमच्या किमतीही वेगवेगळ्या असतात; पण तुम्ही कधी 63 हजार रुपयांचे आइस्क्रीम खाल्ले आहे का? असे आइस्क्रीम दुबईत मिळते. त्याचे नाव आहे ‘ब्लॅक डायमंड’! (Ice-creame)

दुबईमधील ‘स्कूप कॅफे’मध्ये ‘ब्लॅक डायमंड’ नावाचे हे आइस्क्रीम मिळते. ते जगातील सर्वात महागडे आइस्क्रीम म्हणून ओळखले जाते. या आइस्क्रीमच्या एका स्कूपची किंमत 840 डॉलर म्हणजेच 62 हजार 900 रुपये एवढी आहे. ‘ब्लॅक डायमंड’ या आइस्क्रीममध्ये इटालियन टफल्स, इराणी केसर तसेच खाण्यासारखे 23 कॅरेट सोन्याचे वर्ख वापरले जाते. फ—ेश वेनीला बिन्सच्या मदतीने या पद्धतीचे आइस्क्रीम तयार केले जाते. हे आइस्क्रीम तुमच्यासमोरच बनवले जाते. हे आइस्क्रीम एक विशिष्ट कपमध्ये सर्व्ह केले जाते. तसेच या आइस्क्रीमला अजून आकर्षक बनवण्यासाठी ते काळ्या रंगाच्या किंवा गोल्डन रंगाच्या व्हर्सास बाऊलमध्ये दिले जाते. दुबईमधील ज्या कॅफेमध्ये हे महाग आइस्क्रीम मिळते, तेथेच 23 कॅरेट सोन्याने तयार केलेली गोल्ड कॉफीसुद्धा मिळते.

Back to top button