

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक 2023 आणि वन डे विश्वचषक स्पर्धेबाबत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातील वादावर लवकरच पडदा पडेल, असे संकेत मिळत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख नकम सेठी यांनी आशिया चषक स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला. 'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवार, 13 जून रोजी या स्पर्धेची हायब्रीड मॉडेलवर अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
पाकिस्तानने आयोजित केलेल्या आशिया कप स्पर्धेसाठी संघ पाठविण्यास बीसीसीआयने नकार दिला होता. यानंतर पाकिस्ताननेही २०२३ मध्ये भारतात हाेणार्या वन डे विश्वचषक स्पर्धेत सहभागी हाेणार नाही, अशी धमकी दिली हाेती. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख नकम सेठी यांनी आशिया चषक स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला. 'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवार, 13 जून रोजी या स्पर्धेची हायब्रीड मॉडेलवर अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सप्टेंबरमध्ये हाेणारी ही स्पर्धा पाकिस्तानसह श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानसह इतर संघ पाकिस्तानमध्ये आपले सामने खेळतील. त्याचवेळी भारतीय संघाचे सामने श्रीलंकेतील गॉल आणि पल्लेकेले मैदानावर खेळवले जातील.
बहुतेक देशांना हायब्रीड मॉडेल नको होते. मात्र, आतापर्यंत लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर चार सामने होणार असून, त्यात भारतीय संघ खेळणार नाही. भारत विरुद्ध पाकिस्तानचे दोन सामने आणि सुपर फोरचे इतर सर्व सामने श्रीलंकेत होतील. आशिया चषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीचे सीईओ ज्योफ एलार्डिस आणि अध्यक्ष ग्रेग बार्कले पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांची भेट घेण्यासाठी कराचीला गेले होते. त्यावेळी भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तान कोणतीही अट ठेवणार नाही, मात्र आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानमध्ये आयोजित करावे. कारण, या स्पर्धेच्या यजमानपदाचा अधिकार पीसीबीकडे आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे.
पीसीबी प्रमुखांनी त्यांच्या हायब्रीड मॉडेल अंतर्गत चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तर भारताचे सर्व सामने दुसऱ्या देशात खेळवण्यास सांगितले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानच्या लाहोरमध्ये चार सामने होणार असून, त्यात पाकिस्तान-नेपाळ, बांगलादेश-अफगाणिस्तान, अफगाणिस्तान-श्रीलंका आणि श्रीलंका-बांगलादेशचे सामने होतील. त्याचबरोबर भारत-पाकिस्तानसह उर्वरित सामने श्रीलंकेत खेळवले जाण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने हायब्रीड मॉडेल सादर केल्यामुळे पाकिस्तानचा वन डे विश्वचषक खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तानचा सामना अहमदाबादमध्ये होऊ शकतो. त्याच वेळी, पाकिस्तानचे उर्वरित सामने चेन्नई आणि हैदराबादमध्ये हाेतील, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा :