

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील शाहीन बाग तसेच इतर भागातील अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करीत असलेले आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना साकेत येथील न्यायालयाने आज (शुक्रवार) जामीन मंजूर केला. दंगलीला प्रोत्साहन देणे तसेच सरकारी कामात अडथळे आणत असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना अलीकडेच अटक केली होती.
अमानतुल्ला याला अटक केल्यानंतर त्याच्या पत्नीने आमदाराच्या जीवाला धोका असल्याचे सोशल मीडियावरून सांगितले होते. अमानतुल्ला व त्याच्या साथीदारांना गुरुवारी रात्री न्यायालयात हजर करण्यात आले होते. यानंतर या सर्वांची १४ दिवसांसाठी कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी साकेत न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. दरम्यान अमानतुल्ला हा नियमित गुन्हेगार असून त्याची वर्तणूक खराब असल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. जामिया नगरच्या पोलीस निरीक्षकांनी अमानतुल्ला खानविरोधात बॅड कॅरेक्टरचे प्रमाणपत्र देण्याची शिफारस केली होती. त्या प्रस्तावाला पोलीस अधीक्षकांनी आता मंजुरी दिली आहे.
हेही वाचलंत का ?