Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी शेअर केली ‘आजोबां’सोबतची आठवण

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क: आज शिवसेना हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या निमित्त पीएम मोदींसह अनेक राजकीय, सामाजिक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आजोबांसोबतची एक गोड आठवण शेअर केली आहे. (Aaditya Thackeray)

आज (दि.२३) नाशिक येथे ठाकरे गटाचे महाशिबीर पार पडत आहे. या शिबीराला देशभरातील कार्यकर्ते उपस्थित आहेत. हाच योगायोग साधत आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतची आठवण एक्स पोस्ट करत शेअर केली आहे. (Aaditya Thackeray)

आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमावेळचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत आदित्य ठाकरेंना घेण्यासाठी बाळासाहेबांनी हात पुढे केले आहेत. तर मीनाताई ठाकरे या त्यांना घेण्यासाठी त्यांच्या मागे आहेत, असे हे छायाचित्र आहे. तर यामध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील दिसत आहे. (Aaditya Thackeray)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news