

अंकली (बेळगाव) : पुढारी वृत्तसेवा : श्रावण मासाच्या निमित्ताने पाच मित्रांसोबत कृष्णा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी आलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज शुक्रवारी (दि.२६) रोजी सकाळी अथणी तालुक्यातील हल्ल्याळ- दरुर पुलानजीक घडली आहे.
अथणी शहरातील कागजी गल्ली येथील रहिवासी सागर राजू होणकट्टे ( वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाने भेट दिली असून नदीत बुडालेल्या सागरच्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे. या घटनेची नोंद अथणी पोलिस स्थानकात झाली असून पुढील तपास चालू आहे.
हेही वाचलंत का?