देहूरोड : एक्सप्रेस मार्गावरील एक लेन दोन तास बंद | पुढारी

देहूरोड : एक्सप्रेस मार्गावरील एक लेन दोन तास बंद

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : एक्सप्रेस वे मार्गावरील किवळे ते देहू रोड ही लेन दुपारी बारा वाजता बंद करण्यात आली. किवळे पुलाच्या तोंडाशी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग या आशयाचा फलक लावण्यात आला आहे. त्यासाठी ही एक लेन बंद ठेवण्यात आली होती. वाहन चालकांनी सोमाटणे फाट्यावरून उर्से मार्गे वाहतूक केली. ज्या वाहन चालकांना रस्ता समजत नव्हता ते रस्त्याच्या कडेला गाडी लावून उभे राहिले होते. त्यामुळे महामार्गावर रस्त्याच्या कडेला कोंडी दिसत होती.

एम एस आर डी सी एल चे अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस इत्यादी लोकांच्या उपस्थितीत हा फलक बसविण्यात आला. त्यामुळे पुणे बाजूने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मुंबईहून येणारी वाहतूक सुरू होती. दुपारी दोन वाजता काम संपल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या वाहतूक बंदमुळे सोमाटणे पथकर नाक्यावर वाहनांची गर्दी होण्याची शक्यता होती. मात्र, गर्दी झाली नाही. त्यामुळे दोन्ही महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती.

Back to top button