

मुंबई; पुढारी ऑनलाईन
मुंबईतील भांडुप परिसरात मोबाईल चोरीच्या संशयावरून एका तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला आहे. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली आहे.
मुलुंडमधील अमरनगर परिसरात ही घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. तरुण मोबाईल चोरी करत असल्याने त्याला जमावाने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संतप्त जमावाने त्याला लाथा- बुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. यात त्याचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत चोरीच्या संशयावरून तरुणाला मारहाण होण्याची दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याआधी मुंब्रा येथे सुमारे २०-२५ जणांच्या जमावाने एका अल्पवयीन मुलाला तो चोर असल्याचे समजून त्याला सिमेंट मिक्सरला बांधून बेदम मारहाण केली होती. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.