

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : आषाढ महिना संपायला तीनच दिवस बाकी असल्याने आखाडाची मोठी लगबग ग्रामीण भागात सुरू आहे. ओतूर-माळशेज पट्ट्यात गट तयार करून मोठ्या प्रमाणावर मांसाहाराच्या जेवणावळींचे बेत आखले जात आहेत. त्यामुळे विशेषतः गावठी कोंबड्याचा भाव चांगलाच वधारला असून, एका गावठी कोंबड्याला 500 ते 700 रुपये मोजावे लागत आहेत. बॉयलर कोंबड्यांना मोठी मागणी वाढली आहे. सध्या सर्वत्र आखाड पार्ट्या जोरात सुरू आहेत.
या दिवसात चिकन, मटणला मागणी चांगली असते, दरम्यान, गावठी कोंबड्याच्या खरेदीसाठी चिकनच्या दुकानासमोर मोठी गर्दी पाहायला मिळते. रविवारी आखाडाचा शेवटचा दिवस असल्याने बकरी व कोंबड्यांना मागणी आहे. देशी कोंबड्यांना अधिक मागणी आहे. बकर्याचे मटण 600 ते 650 रुपये किलो आहे, तर बॉयलर कोंबडीचे चिकन 220 रुपये किलोने मिळत आहे त्यामुळे बॉयलरला मागणी अधिक आहे असे व्यावसायिकांनी सांगितले.
हे ही वाचा :