

पुढारी ऑनलाईन : भारतीय हवाई दलाचे सूर्य किरण ट्रेनर विमान गुरुवारी कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्याजवळ कोसळले. चामराजनगर शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बोगापूरा येथील मकाली गावाजवळ ही घटना घडली. "या दुर्घटनेतून एका महिलेसह दोन्ही पायलट सुरक्षित बचावले आहेत. त्यांना बंगळूरला एअरलिफ्ट करण्यात आले आहे," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (IAF trainer aircraft crashes)
IAF चे एक सूर्य किरण ट्रेनर विमान आज कर्नाटकातील चामराजनगर जवळ नियमित प्रशिक्षणासाठी जात असताना कोसळले. विमानातील दोन पायलट बचावले आहेत. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत, असे भारतीय हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात राजस्थानच्या हनुमानगडमध्ये भारतीय हवाई दलाचे (IAF) एक मिग-२१ लढाऊ विमान कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. हे लढाऊ विमान नियमित प्रशिक्षणादरम्यान कोसळले होते. या अपघातातून पायलट सुखरूप बचावला होता. त्याला किरकोळ दुखापत झाली होती. हे मिग-21 लढाऊ विमान एका घरावर कोसळले होते. त्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये दाेन महिलांचा समावेश होता. अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी चौकशी करण्यात आली.
हे ही वाचा :