क्रिकेट आणि काश्‍मीर : ‘स्‍वर्गा’तील एक सामना..! सचिन तेंडुलकरने शेअर केला व्‍हिडिओ

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्‍या काश्‍मीर दौर्‍यावर आहे. त्‍याने स्‍थानिक मुलांबरोबर क्रिकेट खेळण्‍याचा आनंद लुटला.
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्‍या काश्‍मीर दौर्‍यावर आहे. त्‍याने स्‍थानिक मुलांबरोबर क्रिकेट खेळण्‍याचा आनंद लुटला.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पृथ्वीवरील स्वर्ग, अशी 'जम्मू काश्मीर' ओळख आहे. त्‍यामुळे या राज्‍यातील निसर्गावर जगभरातील पर्यटक माेहित हाेतात. या पृथ्‍वीवरील स्‍वर्गाची मोहिनी मास्टर ब्लास्टर आणि भारतातील क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यालाही पडली. ताे सध्‍या पत्नी अंजली आणि मुलगी सारासोबत काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. येथे त्‍याने स्‍थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळतानाचा एक व्‍हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्‍याने म्‍हटलं आहे की, "क्रिकेट आणि काश्‍मीर : 'स्‍वर्गा'तील एक सामना..!" ( Sachin Tendulkar on the tour of Kashmir )

 काश्‍मीरमध्‍ये सचिनच्‍या फटकेबाजी…

सचिनने शेअर केलेल्‍या व्‍हिडिओमध्‍ये दिसत की, काश्‍मीर दाैर्‍यावेळी कारमधून जाताना स्‍थानिक मुले रस्‍त्‍यावर क्रिकेट खेळताना सचिनला दिसतात. तो थांबतो. कारमधून उतरुन तो मुलांना भेटतो. ते त्‍याला बॅटिंगसाठी आंमत्रण देतात. सचिनही उत्‍साहाने यामध्‍ये सहभागी होतो. सचिन कशी फटकेबाजी करतो हे स्‍थानिक तरुण मोठ्या उत्सुकतेने पाहतात.  या वेळी सचिनने बॅटच्‍या दांड्यानेही मारलेल्‍या फटका पाहताच उपस्‍थित अचंबितच हाेतात. ('A MATCH in HEAVEN': Sachin Tendulkar Plays Cricket With Locals In Kashmir)

Sachin Tendulkar : बॅट निर्मिती कारखान्‍यालाही दिली भेट

सचिनने श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील चुरसू येथे क्रिकेट बॅट निर्मिती युनिटला भेट दिली होती. याचा  व्हिडिओ त्‍याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या पाेस्‍टमध्‍ये त्‍यानं म्‍हटलं आहे की, "मला दिलेली पहिली बॅट माझ्या बहिणीने दिली होती. ती काश्मीर विलो बॅट होती. मी आता काश्‍मीरमध्‍ये आहे तर विलो येथे भेट देणे अपरिहार्यच आहे. ( Sachin Tendulkar on the tour of Kashmir )

सचिन तेंडुलकरने बुधवारी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील शेवटच्या पॉइंट अमन सेतू पुलाला भेट दिली. सुमारे एक तास चाललेल्या या भेटीदरम्यान तेंडुलकरने अमन सेतूजवळील कमन पोस्टवर सैनिकांशी संवादही साधला, असे भारतीय सैन्‍यदलाच्‍या अधिकारांनी सांगितले.यानंतर त्‍याने दक्षिण काश्मीरमधील पहलगाम पर्यटनस्थळालाही भेट दिली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तेंडुलकर फ्लाइटमध्ये असलेल्या त्याच्या सहप्रवाशांनी टाळ्या वाजवून "सचिन सचिन" असा जयघोष केला. सचिननेही त्‍यांना उभे राहून अभिवादन केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news