India-Canada Row: कॅनडातून रचला जातोय भारतविरोधी मोठा कट, गुप्तचर यंत्रणा सतर्क, व्हायरल पोस्टरमुळे खळबळ

India-Canada Row: कॅनडातून रचला जातोय भारतविरोधी मोठा कट, गुप्तचर यंत्रणा सतर्क, व्हायरल पोस्टरमुळे खळबळ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : खलिस्तान समर्थक कट्टरपंथीयांनी कॅनडामध्‍ये भारताविराेधात माेठा कट रचला जात आहे.  9 ऑक्टोबर रोजी पंजाबमध्ये 'कॅनडा थँक्सगिव्हिंग डे' साजरा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंजाबमध्ये केंद्र आणि राज्याच्या गुप्तचर यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान, खासदार सिमरनजीत सिंह मान यांचे कॅनडा आणि निज्जरसोबतचे पोस्टर व्हायरल होत आहे. शिख आणि मानवाधिकार प्रेमींनी 9 ऑक्टोबर रोजी कॅनडासोबत थँक्सगिव्हिंग डे साजरा करावा, असे पोस्टरमध्ये लिहिले आहे. हे पोस्टर फतेहगड युनिटने प्रसिद्ध केले आहे. पोस्टरवर जर्नेल सिंग भिंद्रनवाला, खासदार सिरमनजीत सिंग मान, हरदीप सिंग निज्जर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशिवाय स्थानिक नेत्यांची छायाचित्रे आहेत. (India-Canada Row)

संबंधित बातम्या 

खलिस्तानी दहशतवादी निज्‍जर याची जून महिन्‍यात कॅनडात हत्‍या झाली. या हत्‍यामागे भारताचा हात असल्‍याचा आराेप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केला हाेता. तेव्‍हापासून दाेन्‍ही देशांमध्‍ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्‍यान, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित तनेजा म्हणाले की, खासदार मान यांनी लोकसभेत जाण्यापूर्वी भारतीय संविधानाची शपथ घेतली होती. आता त्याच संविधानाच्या विरोधात ते देशाचे तुकडे करण्याचा कट रचत आहेत. पण त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. पंजाबमधील हिंदू- शीख बंधुत्व हे त्याचे उदाहरण आहे. (India-Canada Row)

कॅनडाचे खलिस्तान समर्थक आता भारतीय मुत्सद्दींना मारण्यासाठी चिथावणी देत ​​आहेत. सरे येथील श्री गुरू नानक गुरुद्वारामध्ये तीन भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हत्येची मागणी करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. याचा अध्यक्ष हरदीप सिंह निज्जर होता. या गुरुद्वारासमोर हरदीपसिंग निज्जर याची हत्या करण्यात आली होती. 21 ऑक्टोबर रोजी खलिस्तानी समर्थकांनी पुन्हा 'किल इंडिया' अशा घोषणा देत व्हँकुव्हरमधील भारतीय दूतावासासमोर कार रॅली काढण्याची योजना आखली आहे.

कॅनडात याला मोठा विरोध होत आहे. भारतीय वंशाचे जोगिंदर सिंग बसी म्हणतात की, काही लोक भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडवत आहेत. खलिस्तानी आणि कट्टरतावाद्यांना भारत तोडायचा आहे आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कॅनडातील भारतीय राजदूताच्या हत्येसाठी लोकांना प्रवृत्त करणे, हा मोठा गुन्हा आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news