

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जीवनात प्रत्येक जण कधीकधी डोकेदुखीने त्रस्त असतोच. जगातील 52 टक्के लोकसंख्या दरवर्षी काहीही झाले तरी डोकेदुखीने त्रस्त होत असल्याचे नुकतेच नॉर्व्हेजिअन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स ऑफ टेक्नॉलॉजीने केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. (Suffer From Headaches)
मायग्रेन (अर्धशिशी), सामान्य डोकेदुखी आणि चिंता यामुळे निर्माण होणार्या डोकेदुखीचा समावेश आहे. संशोधकांनी 1961 ते 2020 पर्यंतचा अभ्यास केला. यामध्ये डोकेदुखीबाबतच्या डेटाचा समावेश होता. मायग्रेनमुळे 14 टक्के, चिंतेमुळे 26 टक्के डोकेदुखी निर्माण होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. 2019 मध्ये ग्लोबल बर्डन ऑफ डिसिजने केलेल्या एका अभ्यासात जगात मायग्रेनमुळे डोकेदुखी वाढण्याचे प्रमुख कारण आहे. याचे प्रमाण 50 वर्षांखालील महिलांमध्ये सर्वाधिक आहे. (Suffer From Headaches)
दरवर्षी मायग्रेनची समस्या वाढत आहे. मानसिकता, शारीरिक, वातावरण आणि स्वभावामुळे मायग्रेनचे प्रमाण वाढत आहे. मायग्रेनवर सध्या अत्याधुनिक उपचार असून बहुतांश रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. (Suffer From Headaches)
महिलांमध्ये डोकेदुखीची समस्या अधिक
पुरुषांच्या तुलनेत डोकेदुखीचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक आहे. जगभरात 17 टक्के महिला मायग्रेनच्या रुग्ण आहेत. तर पुरुषांमध्ये हेच प्रमाण केवळ 8.5 टक्के आहे. साधारणपणे मायग्रेनची समस्या 6 टक्के महिलांमध्ये सलग 15 दिवसांपेक्षा अधिक राहते तर पुरुषांमध्ये हेच प्रमाण 2.9 टक्के आहे.
अधिक वाचा :