32 crore lottery : नवरोबाशी भांडून गेली, करोडपती होऊनच परतली…

32 crore lottery
32 crore lottery
Published on
Updated on

वॉशिंग्टन : पती-पत्नींमध्ये भांडण होणे यात काहीही नवे नाही. खरे तर अशी भांडणे सुरू होण्याची कारणे अनेकदा क्षुल्लक असतात, नंतर हे वाद शमतातही. सध्या असाच एक प्रकार समोर आला असून तो भलताच सुखद ठरला आहे. यात एका जोडप्याचे भांडण झाले आणि लगेचच दिलजमाई झालीसुद्धा. तथापि, हा नेमका प्रकार काय हे कळल्यावर तुम्हीसुद्धा म्हणाल, 'वा क्या बात है'! या प्रकरणात भांडण झाल्यावर बायको बाजारात गेली आणि रागाच्या भरात ती बाजारातून लॉटरीचे (32 crore lottery) तिकीट घेऊनच परतली.

दुसर्‍या दिवशी घडलेला प्रकार पाहून त्या दोघांनाही सुखद धक्का (32 crore lottery) बसला. ही घटना अमेरिकेतील मिशिगनमधील आहे. तेथे राहणार्‍या एका जोडप्यात किरकोळ गोष्टीवरून भांडण झाले. भांडणाचे कारण असे की, पत्नीला बाजारातून काही गोष्टी हव्या होत्या. मात्र, पती सतत नकार देत होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये खडाजंगी झाली. शेवटी चरफडत पत्नी स्वत:हून बाजारात गेली.

मात्र, हव्या असलेल्या गोष्टी खरेदी न करता रागाच्या भरात तिने लॉटरीचे तिकीट विकत घेतले. घरातून बाहेर पडताना आता मी कधीच घरी परत येणार नाही, असे आपल्या पतीला बजावायला ती विसरली नाही. तिने खरेदी केलेले ते लॉटरीचे तिकीट दोघांचेही नशीब बदलणारे ठरले. कारण, त्या महिलेला या लॉटरीतून चक्क 32 कोटी रुपये (32 crore lottery) मिळाले आणि हे ऐकून ती महिलाही चक्रावून गेली. घरी आल्या आल्या तिने हा सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला आणि मीडिया रिपोर्टनुसार तिकीट खरेदी केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी लॉटरी जिंकल्याचे तिला कळले. सध्या साक्षात लक्ष्मीच त्यांच्या घरी पाणी भरू लागल्यामुळे दोघेही खूश आहेत. शिवाय दोघांमधील भांडणही मिटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news