

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंड राज्यात रविवारी बस दरीत काेसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा २६ झाला आहे.
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवाशांना घेवून बस उत्तरकाशीकडे निघाली हाेती. बस दरीत काेसळली. स्थानिकांनी याची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांसह एसडीआरएफच्या जवानांनी अपघातस्थळी धाव घेतली. बस २०० मीटर खोल दरीत काेसळल्याने १५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. एसडीआरएफचे जवानांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर जखमी असलेल्या ११ जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचलंत का?