

पुढारी ऑनलाईन डेस्क : मल्याळम चित्रपट इंटस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मिका संजीवनचे हार्ट ॲटॅकने निधन झाले. (Lakshmika Sajeevan) ती २४ वर्षांची होती. युनायटेड अरब अमिरातमधील शरजाह येथे तिचा मृत्यी झाला. (Lakshmika Sajeevan)
संबंधित बातम्या –
शॉर्ट फिल्म Kaakka मधून ती लोकप्रिय झाली होती. फॅन्स तिला इन्स्टाग्रामवर श्रद्धांजली वाहत आहेत. २ नोव्हंबरला तिने सोशल मीडियावर शेवटची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिच्या राहत्या घरातील बाल्कनीतील फोटो होता. या फोटोला तिने 'HOPE, light despite all of the darkness…' अशी कॅप्शन लिहिली होती. Koon हा तिचा शेवटचा चित्रपट होता. २०२१ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. शिवाय तिने 'Oru Yamandan Premakatha', 'Panchavarna Thatha', 'Saudi Vellakka', 'Puzhayamma', 'Oru Kuttanadan Blog' and 'Uyare' मध्ये काम केले होते.