महामार्ग पोलिसांकडून मृत्युंजय दूतांना यापूर्वी अपघातग्रस्तांना कशी मदत करावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणखी एकदा ते देण्यात येणार आहे. यात अपघात झाल्या झाल्या अपघातग्रस्ताला गाडीतून बाहेर कसे काढायचे, अपघातस्थळी बॅरिकेडिंग कसे करायचे, जवळच्या रुग्णालयाशी संपर्क कसा साधायचा, महामार्ग पोलिसांशी संपर्क कसा साधायचा, रुग्णावर प्राथमिक तातडीचे उपचार कसे करावेत, ते मिळण्यासाठी काय करावे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. सिंगल यांनी दै. 'पुढारी'ला सांगितले.