

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत जल्लोषात दहीहंडी उत्सव सुरू आहे. दरम्यान, दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना थर कोसळून आतापर्यंत १२ गोविंदा जखमी झाले आहेत. या गोविंदांना मुंबई महापालिका हॉस्पिटलसह अन्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबईत दहीहंडी उत्सव धूम धडाक्यात साजरा होत आहे. अनेक गोविंदा पथक पाच ते दहा थर लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार दुपारी १२ वाजेपर्यंत १२ गोविंदा थर कोसळल्यामुळे जखमी झाले. यातील ५ जणांना नायर हॉस्पिटलमध्ये १ केईएम १ जोगेश्वरी ट्रॉमा सेंटर १ कांदिवली शताब्दी व ४ पोद्दार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान ५ जण किरकोळ जखमी असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तर ७ जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे डॉक्टरने सांगितले.
हेही वाचलंत का ?