

पुढारी ऑनलाईन – पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इंडोनेशियाने आता १० वर्षांचा व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात त्यासाठी तुमच्या खात्यात 1,30,000 डॉलर इतकी रक्कम हवी. भारतीय चलनात ही रक्कम 10,714,806 इतकी होते. तर इंडोनेशियासाठी ही रक्कम २ अब्ज रुपिया इतकी जास्त होते. श्रीमंत पर्यंटकांनी देशात जास्त काळ राहावे यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. (10 year visa for tourists in Indonesia)
"काही पर्यटकांनी येथे यावे आणि अर्थव्यवस्थेसाठी योगदान द्यावे, यासाठी ही योजना आखण्यात आली आहे," अशी माहिती Immigration विभागाचे संचालक विडोडो एकतजाजीना यांनी दिली.
अशा प्रकारचा व्हिसा कोस्टरिका, मेक्सिको अशा देशांत आहे. श्रीमंत, निवृत्त आणि व्यावसायिकांनी आपल्या देशात यावे आणि दीर्घकाळ राहावे यासाठी अशा प्रकारचा दीर्घकालीन व्हिसा दिला जातो. कोरोनानंतर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आखण्यात येत आहे.
सध्या भारतासह ७२ देशांतील नागरिकांसाठी Visa on Arrival ची सुविधा देण्यात येते.
हेही वाचा