पुणे : पर्यटन विकासासाठी नवीन कल्पना राबवा : लोढा

पुणे : पर्यटन विकासासाठी नवीन कल्पना राबवा : लोढा
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून, शासन आणि या क्षेत्रातील भागधारक यांच्या संयुक्त प्रयत्नातून पर्यटनाच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबविण्यात याव्यात, असे निर्देश पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित पर्यटन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पर्यटन विभागाच्या सहायक संचालिका सुप्रिया करमरकर यांच्यासह पर्यटन क्षेत्रात कार्यरत यात्रा व्यवस्थापक (टूर ऑपरेटर्स), हॉटेल असोसिएशन, टुरिस्ट गाइड्स यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लोढा म्हणाले, 'पुणे जिल्ह्यात शिवनेरी, सिंहगड यांसारखे गडकिल्ले, भिगवण पक्षिनिरीक्षण केंद्र आणि जुन्नर द्राक्ष महोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव यांसारखे विविध उपक्रम पर्यटकांना आकर्षित करतात. याच बाबीचा विचार करता पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी जिल्ह्यातील खासगी पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणार्‍या विविध संघटनांची मदत घेऊन समिती स्थापन करावी.'
'पर्यटनक्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा शासनाचा मानस आहे. यादृष्टीने या क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थांना शासनाच्या वतीने आवश्यक ती मदत केली जाईल. समितीच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्र विकसित करण्याच्या दृष्टीने नवनवीन कल्पना सुचविण्यास मदत होणार आहे,' असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news