सिंधुदुर्ग ; परसबाग स्‍पर्धेत तिवरे शाळेचे यश; जिल्‍ह्यात प्रथम क्रमांक | पुढारी

सिंधुदुर्ग ; परसबाग स्‍पर्धेत तिवरे शाळेचे यश; जिल्‍ह्यात प्रथम क्रमांक

सिंधुदुर्ग ; सचिन राणे  लय कष्टाने उभी राहीली परसबाग माझ्या शाळेची… शिंपल घामाचे पाणी गोष्ट आहे श्रमाची… केद्र शासनाने शालेय पोषण आहार योजनेला आता प्रधानमंत्री पोशण शक्ती निर्माण योजना असे नाव दिले आहे. त्याचा एक भाग म्हणून शाळेच्या परसबागेतील भाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या आहारात समावेश व्हावा. तसेच शाळेत अध्यापनासोबतच शाळेच्या परिसरात शेती  पिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. शाळेच्या परिसरात परसबाग फुलवून तेथील भाजीपाला शालेय पोषण अहारामध्ये वापरला जावा असा या योजनेमागील उददेश आहे. त्‍यासाठी शासनाने राज्यभरातील शाळांसाठी आयोजित केलेली परसबाग स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. दरम्यान प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत आयोजित परसबाग स्पर्धेत जिल्हातील कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे खालचीवाडी या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. याबद्दल शाळेचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

या उपक्रमातर्गंत तिवरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात विविध फळभाज्यांच्या व पाले भाज्यांच्या लागवडीसोबत विविध औषधी वनस्पतींची लागवड शाळेच्या परसबागेत केलेली आहे. त्याचे सेंद्रिय पद्धतीने योग्य संगोपन आणि व्यवस्थापन  केलेले आहे. यामध्ये नांगरट प्रात्यक्षिकांसह लेंडी खत, शेण गोवर सेंद्रीय खतांचा वापर करुन परसबाग तयार केली. यात मेथी, आले, मोहरी, कोथींबीर, चवळी, मिरची, टोमॅटो, गवती चहा, पालक, लाल भाजी, मुळा, वाल, भेंडी, कारले या पीकांची लागवड करुन त्यांचे संगोपण करण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी मेहनत घेतली. त्याचबरोबर गवती चहा, लिंबू लोणचे, हळद लागवड करत हॅगिंग प्लांट, स्वत: बनवलेली प्लास्टिक झारीने या परसबागेत पाणी घालण्यात आले. ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या मदतीने साकार केलेली परसबाग आज अनेक शाळांना आदर्शवत उपक्रम मार्गदर्शक ठरत आहे.

याबरोबरच शाळेचा कविता संग्रह प्रसिध्द झाला असून, येथील विद्यार्थी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्तरावर चमकले आहेत. नुसता हाच उपक्रम न घेता दैनंदीन जीवनात सकाळी उठल्यापासून लागणा-या वस्तूंची शाळेच्या व्हरांड्यात मांडणी करुन त्याची पूजा केली जाते. असे कुठेच न दिसणारं चित्र शाळेत प्रवेश करताना दिसते. त्याचबरोबर स्वच्छता ही काळाची गरज ओळखून विद्यार्थींमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी यासाठी सुका कचरा, ओला कचरा, प्लास्टिक यासाठी स्वतंत्र बजेट ठेऊन यासाठी नियोजन केल आहे.

परसबाग स्पर्धेत जिल्हात प्रथम आलेल्या या शाळेने अनेक उपक्रम राबविले असून, आता परसबाग स्पर्धेची राज्य स्तरीय टीम या शाळेला भेट देणार आहे. शाळेच्या या विशेष उपक्रमाबद्दल त्‍यांच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास आंबेलकर, उपाध्यक्ष विनिता गोसावी, व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच रवींद्र आंबेलकर उपसरपंच राजेंद्र वाळवे, ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ व पालक वर्गातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक विजय शिरसाट, परसबाग प्रमुख संदीप कदम, विजय मेस्त्री, हेमंत राणे, सौ करूणा आंबेलकर, स्वयंपाकी, विद्यार्थी व पालक यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेच्या या यशाबद्दल जिल्हास्तरीय व तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन शाळेस गौरविण्यात आले आहे.

हेही वाचा :  

Back to top button