

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात हार्दिक पांड्याने गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले. चार षटकांत अवघ्या १९ धावांत एक बळी घेत भारताला पहीले यश मिळवून दिले. हार्दिक पंड्या याने किंग्सची विकेट घेतली. त्याला पाड्यांने क्लिन बोल्ड केले. हार्दिकने या विकेटसह ऐतिहासिक कामगिरी केली.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५००+ धावा अन् ५० विकेटस् घेणारा हार्दिक पंड्या हा भारताचा पहिलाच, तर जगातला दहावा अष्टपैलू खेळाडू ठरला. यापूर्वी शाकिब अल हुसैन, शाहीद आफ्रिदी, ड्वेन ब्राव्हो, जॉर्ज डॉक्रेल, मोहम्मद नबी, मोहम्मद हाफिज, केव्हिन ओ ब्रायन, थिसारा परेरा यांनी हा पराक्रम केला आहे.
ब्रँडन किंगला केले क्लिन बोल्ड
दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणारा २८ वर्षीय हार्दिक पंड्या शानदार फॉर्ममध्ये आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी-२० कायले मेयर्स व ब्रेंडन किंग्स या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासून प्रहार केला. रोहित शर्माने हार्दिक पांड्याकडे चेंडू सोपवला. आणि पांड्याने रोहितचा निर्णय योग्य ठरविला. हार्दिक पंड्याने भारताला किंग्सची विकेट मिळवून दिली. त्याला पाड्यांने क्लिन बोल्ड केले. किंग्जने २० चेंडूंत २० धावा करताना तीन चौकार खेचले. किंग्जची विकेट हि पाड्यांची टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० वी विकेट ठरली.
सूर्यकुमार यादवने केलेल्या झुंजार ७६ धावांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर तिसर्या टी-२० सामन्यात ७ विकेटस्नी विजय मिळवून मालिकेत २-१ ने आघाडी घेतली.
वेस्ट इंडिजने कायले मेयर्सच्या दणकेबाज ७३ धावा आणि त्यानंतर शिमरोन हेटमायर व रोव्हमन पॉवेल यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना वेस्ट इंडिजने ५ बाद १६४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली होती. भारताने हे आव्हान एक षटक राखून पूर्ण केले. सूर्याच्या अर्धशतकाशिवाय श्रेयस अय्यर (२४)आणि ऋषभ पंत (नाबाद ३३) यांनी विजयात हातभार लावला. रोहित शर्मा ११ धावा करून जखमी निवृत्त झाला.जोसेफला चौकार मारताना त्याच्या पाठीत चमक भरल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते.