हायस्पीड रेल्वे : पुणे-नाशिक प्रवास अवघ्या दीड तासात

File Photo
File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दोन प्रमुख जिल्ह्यांना जोडणार्‍या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला निती आयोगाने मजुंरी दिली आहे. आता हा प्रकल्प अंतिम परवानगीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आला आहे. या रेल्वे मार्गामुळे पुणे-नाशिक हा प्रवास केवळ 1 तास 45 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

हा प्रकल्प महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पारेशनतर्फे (महारेल) राबविण्यात येत आहे. ब्रॉड गेज प्रणालीवरील हा देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग कॉरिडॉर असेल. या प्रकल्पामुळे नाशिकची द्राक्षे आणि कांदा पुण्याला दोन तासांत पोहोचणार आहे.

सध्या, पुणे आणि नाशिक दरम्यान थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे रस्ते मार्गाने या प्रवासासाठी चार ते साडे चार तासांचा कालावधी लागतो. परिणामी पुणे-नाशिक मार्ग रेल्वेने जोडण्याची मागणी अनेक वर्षापासून होती. गेल्यावर्षी मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गाच्या कामांना वेग आला. या दोन्ही जिल्ह्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. हा मार्ग 1200 दिवसांत म्हणजेच सुमारे 4 वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 25 हजार नोकर्‍या निर्माण होतील.

पुणे स्थानकातून ही सेमी ट्रेन धावणार असून हडपसरला एलिव्हेडेटड डेकवरुन जाईल आणि हडपसर ते नाशिक दरम्यान जमिनीवरुनच धावेल. रेल्वे रुळांशेजारील नागरिकांना पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी रुळांखालून प्रत्येक 750 मीटर एक्झिट/ओपनिंग मार्ग असतील. हाय-स्पीड पॅसेंजर ट्रेन, मालगाडी एकाच ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकवरुन धावतील, अशा पद्धतीने या मार्गाचे अलाइनमेंट डिझाइन असणार आहे.

पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तर नाशिकमधील सिन्नर, नाशिक तालुक्यातून धावेल.या प्रकल्पासाठी 1458 हेक्टर क्षेत्रापैकी 5.62 हेक्टर जमिन संपादित केली आहे.

मार्गाचे फायदे

ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स, साखर आणि शेती उत्पादनांच्या महसुलात वाढ. पुणे-नाशिक रस्ते मार्गावरील गाड्यांची संख्या कमी होईल, प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

वीस स्थानके

पुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, आंळदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, साकुर, आंभोरे, संगमनेर, अमोण, नांदूर शिंगोटे, सिन्नर, मोहदरी, वडगाव पिंगला, नाशिक रस्ता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news