हवेचा गुणवत्ता स्तर : मुंबई उपनगरांची हवा बिघडली

हवेचा गुणवत्ता स्तर : मुंबई उपनगरांची हवा बिघडली
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहरातील हवेचा गुणवत्ता स्तर खालावला असून अनेक ठिकाणी प्रदूषणाच्या धुक्याची चादर पसरलेली आढळली. हवेची गुणवत्ता माझगावमध्ये 313, तर मालाडमध्ये 316 एक्यूआयवर पोहोचली. देशातील सर्वात प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 343 नोंदण्यात आला आहे.

अनेक भागांमध्ये नागरिकांना सर्दी आणि घशात खवखव होण्याचा त्रास होत असून श्वसनाचे आजार असलेल्यांना अधिक त्रास होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत वातावरणात गारवा जाणवत आहे. या काळात जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहू लागतात. त्यामुळे धूलिकण वाहून न जाता ते जमिनीलगतच हवेत तरंगतात आणि प्रदूषणाची पातळी वाढू लागते.

त्यामुळे हवेचा स्थर आणखी काहीसा घसरला असल्याचे सफर या हवेच्या गुणवत्तेची नोंद करणार्‍या प्रणाली अहवालातून समोर आले आहे. अवकाळी पावसानंतर थंडी जाणवू लागली आहे. यामुळेही हवामान बदलून गेले असल्याचे सफर संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. गुरफान बेग यांनी सांगितले.

सर्दी-खोकला, दमा असलेल्या रुग्णांंना या वातावरणाचा त्रास होतो . त्यात ज्यांना कोविड होऊन गेला आहे असे रुग्ण, कोविड फायब्रोसिसचे रुग्ण, फुफ्फुसाशी व श्वासांशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांना याचा काहीसा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे अशा वातावरणात सतत मास्क वापरावा.
-डॉ. अविनाश सुपे, टास्क फोर्स मृत्यू विश्लेषण समितीचे, प्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news