हरिद्वार : 10 रुपयांत तुमच्या नावे गंगास्नान; कडाक्याच्या थंडीत अजब ऑफर

हरिद्वार : 10 रुपयांत तुमच्या नावे गंगास्नान; कडाक्याच्या थंडीत अजब ऑफर
Published on
Updated on

हरिद्वार, वृत्तसंस्था : कडाक्याच्या थंडीत गंगास्नान करून पुण्य कमावण्याची इच्छा असणार्‍या पण पाण्यात उतरायला घाबरणार्‍या भाविकांना 10 रुपयांत तुमच्या वतीने गंगेत स्नान करतो, अशी अजब ऑफर देत एका तरुणाने कमाईचा अनोखा प्रकार शोधला आहे.

सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी तो बघितला आहे. संधीचे सोने करणारा तरुण, रोजगाराची नवीन संधी अशा अनेक कॉमेंटस् करत वापरकर्त्यांनी त्याचे कौतुकही केले आहे.

हरिद्वारच्या आशुतोष शुक्लाचा हा व्हिडीओ सध्या तुफान गाजत आहे. त्यात तो गंगेच्या काठावर असलेल्या रेलिंगवर उघडा बंब बसला असून 'थंडीत पाण्यात न उतरता पुण्य कमवा. दहा रुपयांत तुमच्या वतीने गंगास्नान', असे मोठमोठ्याने ओरडत तो येणार्‍या भाविकांना आकर्षित करीत आहे.

उत्तर भारत सध्या कडाक्याच्या थंडीने गारठला आहे. तीर्थस्थळी देशभरातून येणार्‍या भाविकांना या हाडे गोठवणार्‍या थंडीमुळे गंगास्नानापासून मुकण्याची हुरहुर लागते. हे ध्यानात घेत आशुतोषने हा नवीनच प्रकार शोधून काढला आहे. त्याच्या या पेड गंगास्नानाला भाविकांचाही खास करून वृद्ध भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news