

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर महापालिकेच्या इतिहासात तिसर्यांदा प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. मनपाच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाल रविवारी संपुष्टात आल्याने आज सोमवार पासून आयुक्त पी. शिवशंकर हे प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत.
ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्याने यंदा राज्यातील मुदत संपलेल्या 18 महापालिकांची निवडणूक लांबणीवर पडली. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होणे अपेक्षित असते. मात्र, ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून यंदा निवडणूक कधी होईल याची शाश्वती नाही. महापालिकेची गत निवडणूक सन 2017 मध्ये झाली होती. या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाल रविवारी संपुष्टात आला. त्यामुळे शासनाने प्रशासक म्हणून आयुक्त पी. शिवशंकर यांची नियुक्ती केली आहे.
रविवारी अखेरच्या दिवशी महापौरांसह इतर पदाधिकार्यांनी महापालिकेच्या गाड्यांचा वापर केला. रविवारी सायंकाळी या गाड्या काढून घेण्यात आल्या. सोमवारपासून मनपावर पी. शिवशंकर यांच्या रूपाने प्रशासकराज असणार आहे. विद्यमान आयुक्त पी. शिवशंकर यांनी गत दोन वर्षांच्या काळात प्रशासनाच्या अधिकारात पदाधिकारी, नगरसेवकांना हस्तक्षेप करू दिला नाही. त्यामुळे पदाधिकारी व आयुक्त यांच्यात अनेकदा संघर्ष पहावयास मिळाला. पदाधिकारी वा सर्वसाधारण सभेच्या अधिकाराबाबत ते दक्ष राहत, मात्र प्रशासकीय अधिकारामध्ये राजकीय हस्तक्षेप त्यांना खपवून घेतला नाही.
म्हणून अनेकदा त्यांच्या बदलीचा घाट घालण्यात आला. याबाबत पुढाकार कोण घ्यायचे यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये घोडे अडल्याचे चित्र वेळोवेळी दिसून आले. अखेर एकमत न झाल्याने बदलीचा प्रयत्न अपयशी ठरला. सोमवारपासून आयुक्तांकडे मनपाच्या कारभाराची सुत्रे राहणार आहेत. प्रशासक म्हणून काम करताना जनभावनेचा आदर करणार असे त्यांनी अंदाजपत्रकीय सभेत सांगितले खरे, मात्र प्रत्यक्षात ते शब्द पाळणार का? विषयी उत्सुकता आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांची कार्यपद्धती पाहता प्रशासकीय राजवटीत ते राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाहीत, असा अंदाज वर्तविला जात आहे.
म्हणून अनेकदा त्यांच्या बदलीचा घाट घालण्यात आला. याबाबत पुढाकार कोण घ्यायचे यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये घोडे अडल्याचे चित्र वेळोवेळी दिसून आले. अखेर एकमत न झाल्याने बदलीचा प्रयत्न अपयशी ठरला.
सोमवारपासून आयुक्तांकडे मनपाच्या कारभाराची सुत्रे राहणार आहेत. प्रशासक म्हणून काम करताना जनभावनेचा आदर करणार असे त्यांनी अंदाजपत्रकीय सभेत सांगितले खरे, मात्र प्रत्यक्षात ते शब्द पाळणार का? विषयी उत्सुकता आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांची कार्यपद्धती पाहता प्रशासकीय राजवटीत ते राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाहीत, असा अंदाज वर्तविला जात आहे.
सोलापूर महापालिकेवर आयुक्त पी. शिवशंकर यांच्या रूपाने तिसर्यांदा प्रशासकराज आले आहे. याआधी सन 1964 ते 1967 व त्यानंतर 1982 ते 1985 या कालावधीत महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती होती, अशी माहिती माजी महापौर प्रा. डॉ. पुरणचंद्र पुंजाल यांनी दिली. प्रशासकाची नियुक्ती ही सहा महिन्यांकरिता असते, मात्र ओबीसी मुद्द्यावरून यंदाची निवडणूक कधी होणार हा विषय गुलदस्त्यातच असल्याने प्रशासकाचा कालावधी मुदतीपेक्षा जास्त राहू शकतो, अशी चर्चा आहे.