

इस्लामपूर ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना सभागृहातून निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
तालुकाध्यक्ष विजय पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहराध्यक्ष शहाजी पाटील, महिला तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, युवकचे संग्राम देशमुख यांच्या नेतृत्ववाखाली हा मोर्चा काढण्यात आला. शहरासह तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेवून प्रतिबंधात्मक कारवाईक केली. माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, युवकचे स्वरुप मोरे, सचिन कोळी, अंगराज पाटील, विशाल सुर्यवंशी, शंकर चव्हाण, प्रियांका साळुंखे यांच्यासह तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :