

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गानंतर आता शक्तिपीठ महामार्ग उभारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेली माहूर, तुळजापूर, अंबाजोगाई ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. त्याचबरोबर औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंगे, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबरदेखील जोडले जाणार आहेत.
760 कि.मी.
एकूण लांबी
ग्रीनफील्ड, सहापदरी
महामार्गाचे स्वरूप
86,300 कोटी रुपये
अंदाजित खर्च
2028-29 पर्यंत
काम पूर्णत्वाला जाणार