

पुढारी ऑनलाईन डेस्क : उमेदवारांबरोबरच नेत्यांचीही धाकधूक वाढविणाऱ्या राज्यसभेच्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी ठरली. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीची मते फोडण्यात यश आले. पण विरोधकांना पडलेली अतिरिक्त मते ही महाविकास आघाडीची नसून ते मते कुठून आली याची कल्पना आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
राज्यसभेच्या चार राज्यांतील १६ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्यानंतर लगेचच मतमोजणीस सुरूवात झाली. रात्री उशीरा निकाल स्पष्ट झाला. सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. या आखाड्यात त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय पवार यांना चितपट करून अस्मान दाखविले. धनंजय महाडिक यांना ४१ मते मिळाली.
निकालानंतर आज शुक्रवारी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली "जी मते फुटली आहेत ती अपक्षांची आहेत. प्रफुल्ल पटेल यांना मिळालेलं अतिरिक्त मतं आघाडीचं नव्हे. ते अपक्षांचं मतं होतं. मला सांगूनच त्या अपक्षाने मतदान केलं होतं" असे त्यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?