विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडर महागले

विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडर महागले
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडर महागले : विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रूपयांनी वाढ करण्यात आली आहे.

नव्या दरवाढीनूसार मुंबईत १४.२ किलोग्रॅम एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत ८३४.५० रूपयांवरून ८५९.५ रूपयांपर्यंत पोहचली आहे. तर, कोलकाता मध्ये सिलेंडरचे दर ८८६ रूपये, दिल्लीत ८५९.५ रूपयांपर्यंत पोहचले आहेत. ज्यात एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी जाहीर केले जातात.

यापूर्वी १ जुलै २०२१ मध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. जुलै महिन्यात घरगुती गॅसचे सिलेंडरचे दर ८३४ रूपये होते. १ जानेवारी ते १७ ऑगस्ट पर्यंत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत तब्बल १६५ रूपयांनी वधारली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करते.

पंरतु, यंदा पहिल्यांदाच महिन्याच्या मध्यात अशाप्रकारे सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१ जानेवारीला गॅस सिलेंडरच्या किंमतीत १५ रूपयांची वाढ करण्यात आली होती. फेब्रुवारीत २५ रूपयांची वाढ करण्यात आल्यानंतर ​घरगुती गॅसचे दर ७९४ पर्यंत पोहचले होते.

एप्रिल महिन्यात मात्र दरांमध्ये १० रूपयांची कपात करण्यात आली होती.

मे महिन्यात सिलिंडरचा भाव ८१० रुपये झाला होता. तर, जून महिन्यात कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केला नाही.

१९ किलोग्रॅम ​वजनी सिलेंडरही महागले

१९ किलोग्रॅम वजनी व्यावसायिक वापरात येणाऱ्या किंमतींमध्येही ६८ रूपयांची वाढ करण्यात आली आहे.

राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरचे दर १ हजार ६१८ पर्यंत पोहचले आहेत.

ऑगस्टच्या सुरूवातील १९ किलोग्रॅम वजनी सिलेंडरच्या किंमतीत ७३.५ रूपयांनी वाढवण्यात आले होते. पंरतु, त्यावेळी घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले होते.

इंडियन ऑईलने तुर्त त्यांच्या संकेतस्थळावर नवीन किंमतींसंबंधीची माहिती दिलेली नाही.

पंरतु,सिलेंडर बुक करणाऱ्या ग्राहकांकडून वाढीव दर वसुल केले जात आहे. गेल्या एका वर्षात आतापर्यंत एलपीजी गॅसची किंमत २६५ रूपये ५० पैशांनी वाढली आहे, हे विशेष.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news