

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्य विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सतेज पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, सुनील शिंदे, वसंत खंडेलवाल यांना विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली.
यावेळी संसदीय कार्यमंत्री अॅड. अनिल परब, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री दिवाकर रावते, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत विविध पक्षांचे मान्यवर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.