वाई : अनैतिक संबंधातून पतीनेच केला पत्नीवर जीवघेणा हल्ला

वाई : अनैतिक संबंधातून पतीनेच केला पत्नीवर जीवघेणा हल्ला
Published on
Updated on

वाई ; पुढारी वृत्तसेवा : पती व तिच्या प्रेयसीमधील अनैतिक संबंधाला विरोध करत असल्याच्या रागातून पतीनेच प्रेयसीच्या मदतीने पत्नीवर जीवघेणा हल्‍ला केल्याची घटना वाई शहरातील फुलेनगर येथे घडली आहे. याप्रकरणी दोघांवर वाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित पती सिकंदर आमीन आतार (रा. फुलेनगर) व त्याची प्रेयसी संतोषी पिसाळ (रा. व्याजवाडी, ता. वाई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी तन्झीला सिकंदर आतार (वय 30, रा. फुलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

रविवार दि. 21 रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास सिकंदर याने भाजी मंडई परिसरात तन्झीला यांना शिवीगाळ करत धक्‍काबुक्‍की केली. त्यानंतर चित्र टॉकीजच्यासमोर सिकंदर याने तन्झीला हिचे पकडले याचवेळी संतोषी हिने तन्झीला यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. यानंतर दोघांनीही तन्झीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे नागरिक जमा झाले. त्यामुळे सिकंदर व संतोषी यांनी तेथून पळ काढला. कोयत्याने वार केल्याने तन्झीला या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news