लियोनल मेस्सीचे स्वप्न साकार!

लियोनल मेस्सीचे स्वप्न साकार!
Published on
Updated on

ब्युनोस आयर्स ; वृत्तसंस्था : फायनलमध्ये चार वेळा पराभूत, मोठ्या स्पर्धेत बाहेर पडण्याची निराशा आणि राष्ट्रीय संघाकडून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अखेर सुपरस्टार लियोनल मेस्सीच्या नावे देशाकडून खेळताना किताबाची नोंद झाली.

ब्राझीलला 1-0 असे पराभूत करीत अर्जेंटिना संघाने तब्बल 28 वर्षांनी जेतेपद मिळवले. यादरम्यान मेस्सीने 151 सामने खेळत अर्जेंटिनाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रमदेखील केला.

मेस्सीसमोर आता पुढील आव्हान हे पुढील वर्षी होणारा विश्वचषक जिंकण्याचे असेल. संघ असे करण्यास यशस्वी झाला तर, 1986 सालच्या मॅराडोनाच्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकतो.

अंतिम सामना होण्यापूर्वीपर्यंत मेस्सी अर्जेंटिना संघाकडून केवळ 2005 मध्ये 20 वर्षांखालील विश्वचषक आणि 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकला होता. सीनिअर संघासोबत त्याची निराशा वयाच्या 19 व्या वर्षांपासूनच सुरू झाली होती.

जेव्हा 2006 विश्वचषक उपांत्यपूर्व सामन्यात संघाला जर्मनीकडून पराभूत व्हावे लागले. लगेच एका वर्षानंतर ब्राझीलने फायनलमध्ये अज टिनाला 3-0 असे पराभूत करीत कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

विश्वचषक 2014 फायनलमध्ये अर्जेंटिनाला जर्मनीकडून पराभूत व्हावे लागले. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. यानंतर चिलीने 2015 आणि 2016 मध्ये कोपा अमेरिका स्पर्धा जिंकण्याची संधीदेखील अर्जेंटिनाने गमावली.

मेस्सीने दक्षिण अमेरिका विश्वचषक क्वालिफायरमध्ये पुनरागमन केले. संघाला रशिया येथे होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवून देण्यात त्याला यश मिळाले; पण फ्रान्सविरुद्ध संघाला पराभव स्वीकारावा लागल्याने ते स्पर्धेबाहेर पडले. मेस्सीने 2019 कोपा अमेरिका स्पर्धेत आक्रमक खेळ केला.

कमी अनुभव असलेले प्रशिक्षक लियोनल स्केलोनीच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंसोबत त्याने सर्वोत्तम कामगिरी केली. वयाच्या 34 व्या वर्षी त्याने कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद मिळवले. त्यामुळे त्याची मोठ्या स्पर्धेत देशासाठी जेतेपद मिळवण्याची प्रतीक्षा संपली, असे म्हणायला हरकत नाही.

मेस्सीचा मैदानातून पत्नीला व्हिडीओ कॉल

लियोनल मेस्सीने देशासाठी मिळवलेल्या पहिल्या मोठ्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी थेट मैदानातून आपली पत्नी अँटोनेला रोक्कुझो आणि मुलांना व्हिडीओ कॉल केला.

विजयानंतर मेस्सी आपल्या कुटुंबीयाशी व्हिडीओ कॉलवर आनंद व्यक्त करत असलेला खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला. देशाकडून खेळताना मिळवलेले गोल्ड मेडल दाखवत कुटुंबीयांसोबत सोनेरी क्षण मेस्सीने शेअर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news