दुबईत अवतरणार चंद्र, असा असेल मून रिसॉर्ट

दुबईत अवतरणार चंद्र, असा असेल मून रिसॉर्ट
Published on
Updated on

दुबई : संयुक्त अरब अमिरात हा देश आपल्या गगनचुंबी इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. यापैकी एक म्हणजे बुर्ज खलिफा होय. ही उत्तुंग इमारत पाहण्यासाठी जगभरातील लोक दुबईला भेट देत असतात. या शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. कारण संयुक्त अरब अमिरातने चक्क चंद्रच जमिनीवर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची तयारी आणि आराखडाही तेथील सरकारने तयार केला आहे.

दुबईत एक विशाल मून रिसॉर्ट उभारण्याची तयारी करण्यात येत आहे. यासाठी सर्वप्रथम चंद्रासारखी दिसणारी इमारत तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर परिसराला एखाद्या भव्य रिसॉर्टसारखे रूप देण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 38 हजार कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. या अनोख्या आणि महागड्या प्रोजेक्टवर लवकरच काम सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.

चंद्राच्या आकाराच्या या मेगा रिसॉर्टमध्ये सर्व आधुनिक सोयी आणि सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या इमारतीत नाईट क्लब व वेलनेस सेंटरही तयार केले जाणार आहे. असेही म्हटले जात आहे की, हे मून रिसॉर्ट दरवर्षी 25 लाख पाहुण्यांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरेल. यामुळे वर्षाला 13 हजार कोटी कमाई होण्याचा अंदाज आहे.

इमारतीत चंद्रासारख्या दिसणार्‍या गोळ्याचा व्यास 622 मीटर ठेवण्याची शक्यता आहे. या रिसॉर्टमध्ये पर्यटक मून शटलच्या प्रवासाचाही आनंद लुटू शकतील. हे शटल रिसॉर्टच्या आसपास असणार्‍या ट्रॅकवरही फिरू शकणार आहे. लवकरच उभारण्यात येणार्‍या या मून रिसॉर्टमुळे दुबईच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार मिळण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news