राज्यातील 47 हजार होमगार्डना मिळणार विमा संरक्षण

राज्यातील 47 हजार होमगार्डना मिळणार विमा संरक्षण
Published on
Updated on

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील जवळपास 1850 व राज्यातील 47 हजारपेक्षा जास्त होमगार्डना विम्याचे संरक्षण मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व होमगार्डचे एचडीएफसी बँकेत खाते उघडण्याचे काम सुरू असून जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व होमगार्डचे बँक खाते सुरू होणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

विविध सण, उत्सव कायदा व सुव्यवस्था तसेच संकटाच्या काळामध्ये पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड आपले कर्तव्य बजावत असतात. शहरासह ग्रामीण भागातील अनेक होमगार्ड पोलिसांना मदत करत असतात. याबाबत काही अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांप्रमाणेच होमगार्डनाही सुरक्षा मिळाव्यात, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. होमगार्डना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी बँकांशी संपर्क साधून प्रयत्न केले असता एचडीएफसी बँकेने होमगार्ड स्वयंसेवकांना तसेच वेतन कर्मचारी व अधिकार्‍यांना सुविधा देण्याचे मान्य केले.

पोलिस महासंचालक तथा महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या पाठपुराव्याला यश आले. ऑगस्ट 2022 पासून जिल्ह्यातील सर्व होमगार्डना सोयी सुविधा मिळणार आहेत.

जिल्ह्यातील 1850 जणांचा समावेश

विनामूल्य वैयक्तिक अपघात 50 लाख व दहा लाख, विनामूल्य स्थायी अपघाती विकलांगता विमा 50 लाख, विनामूल्य शैक्षणिक लाभ चार लाखापर्यंत. खातेधारकाचे निधन झाल्यास त्याच्या पाल्याला रुग्णालयामध्ये दाखल झाल्यावर 15 दिवसांपर्यंत एक हजार रुपयेप्रमाणे विनामूल्य लाभ, विनामूल्य जीवन विमा चार लाख व इतर सोयी सुविधा उपलब्ध.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news