

मॉस्को : अमेरिकन आकाशात नुकताच आगीचा एक गोळा दिसून आल्याने लोकांमध्ये एकप्रकारची भीती निर्माण झाली. आगीचा हा गोळा म्हणजे रशियन गुप्तचर उपग्रह होता आणि तो निष्क्रिय होऊन पृथ्वीच्या दिशेने येत होता. आगीचा हा गोळा संपूर्ण अमेरिकेतून दिसत होता. या उपग्रहाचे नाव 'कोसमोस-2551' असे असल्याचे म्हटले जात आहे.
अवकाशात जळत असलेल्या उपग्रहाचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. यामध्ये रात्रीच्यावेळी एक अत्यंत चमकदार वस्तू आकाशात दिसून येत आहे. या वस्तूला एक शेपूटही दिसून येत आहे. यातून असे स्पष्ट होते की, रशियाच्या 'कोसमोस 2551' या उपग्रहाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच त्याचे असंख्य तुकडे झाले.
रशियन उपग्रह जळत असलेला हा व्हिडीओ अमेरिकेतील मिशिन या शहरात रेकॉर्ड करण्यात आला असून, तो उल्का सोसायटीने शेअर केला आहे. युजर्स यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत. ही घटना अवघ्या दोन दिवसांपूर्वी घडली आहे.
'कोसमोस 2551' नामक हा गुप्तचर उपग्रह रशियाने 9 सप्टेंबर रोजी लाँच केला होता. मात्र, रशियाला या उपग्रहाची दिशा निश्चित करता आली आहे. यामुळेच तो कोसळणार आहे, असे म्हटले जात होते. हा एक छोटा उपग्रह होता, तरीही त्याचे वजन 500 किलो इतके होते.
यामुळे या उपग्रहाचे अवशेष पृथ्वीपर्यंत येण्याची शक्यताच कमी होती. काही दिवसांपूर्वी चीनचे एक वजनदार रॉकेट अनियंत्रित झाले होते. यामुळे ते मालदिवनजीकच्या समुद्रात कोसळले होते. या चिनी उपग्रहाबाबत सर्वत्र चिंता व्यक्त होत होती.