यूपीएससी मध्ये महाराष्ट्राच्या ५८ जणांचा झेंडा; मृणाली जोशी देशात 36वी

शुभम कुमार
शुभम कुमार
Published on
Updated on

भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रवेशद्वार असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, बिहारचा आणि आयआयटी मुंबईतून पदवीधर झालेला शुभम कुमार देशात पहिला आला आहे. तर नागपूरची मृणाली जोशी देशात 36वी आली असून अहमदनगरचा विनायक नरवडे देशात 37 वा आला आहे. तर 95व्या क्रमांकावर विनायक महामुनी आहे. मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी वाय. पी. सिंग यांची मुलगी इशा सिंग हिने 191व्या क्रमांक मिळवला.

यूपीएससी मध्ये 761 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. भोपाळच्या जागृती अवस्थीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर अंकिता जैन हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

यंदा या परीक्षेला सुमारे 10 लाख 40 हजार 60 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 4 लाख 82 हजार 770 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून 10 हजार 564 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यातून दोन हजार 53 विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन अंतिम 761 जणांची यादी जाहीर करण्यात आली. यंदाच्या निकालात मुलींची संख्या वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अंतिम यादीत 545 पुरुषतर 216 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील यशवंत

36 मृणाली अविनाश जोशी
37 विनायक कारभारी नरवडे
134 रिचा कुलकर्णी
137 कमलकिशोर कांडरकर
138 दर्शन प्रकाशचंद दुग्गड
166 निवृत्ती सोमनाथ आव्हाड
177 प्रतिक जुईकर
182 गौरव रवींद्र साळुंखे
224 तुषार उत्तम देसाई
236 प्रथमेश अरविंद राजेशिर्के
243 साहिल खरे
266 संकेत बळवंत वाघे
312 प्रवीण परमानंद दराडे
325 आनंद अशोक पाटील
335 यशवंत श्रीकांत विसपुते
338 दिव्या अर्जुन गुंडे
349 सुहास लक्ष्मण गाडे
353 सूरज भाऊसाहेब गुंजाळ
361 अनिल रामदास म्हस्के
426 अनिकेत अशोक फडतरे
430 श्रीराज मधुकर वाणी
432 राकेश महादेव अकोलकर
445 शुभम पांडुरंग जाधव
449 अमर भीमराव राऊत
453 शुभम भाऊसाहेब नागरगोजे
455 ओंकार मधुकर पवार
466 नितीन गंगाधर पुके
476 प्रणव विनोद ठाकरे
502 अभिमन्यू यशवंत मुंडे
511 अनुजा अनंत मुसळे
516 बाबाराव बानकेश पवार
517 अनिकेत लक्ष्मीकांत कुलकर्णी
520 अश्विन बाबूसिंग राठोड
525 माधव श्रीकांत कुलकर्णी
542 शरण गोपीनाथ कांबळे
561 माधुरी भानुदास गरुड
564 स्नेहल वसंतराव ढोके
566 सचिन देवराम लांडे
572 स्वप्नील यादवराव चौधरी
577 पूजा अशोक कदम
587 विकास बाळासाहेब पालवे
594 दामिणी दिवाकर
614 हर्षल भगवान घोगरे
617 अजिंक्य अनंत विद्यागर
629 निलेश श्रीकांत गायकवाड
640 कुणाल उत्तम श्रोते
641 सायली अशोक गायकवाड
649 शिवहर चक्रधर मोरे
653 सुब्रमन्य भालचंद्र केळकर
660 सुमितकुमार दत्तहरी धोत्रे
664 दीक्षा अरुण भवरे
691 सुदर्शन नानासाहेब सोनवणे
692 विनीत बन्सोड
705 अजय काशीराम डोके
713 देवव्रत वसंतराव मेश्राम
727 शुभम अशोक भैसारे
732 पीयूष सुधाकर मडके
749 स्वरूप रवींद्र दीक्षित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news