मुंबईत महिला असुरक्षित; जुलैपर्यंत ५५० बलात्कार

मुंबईत महिला असुरक्षित; जुलैपर्यंत ५५० बलात्कार
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : यावर्षी जुलैपर्यंत मुंबईत 550 बलात्काराच्या घटना घडल्या असून याप्रकरणी पोलिसांनी 445 जणांना अटक केल्याचे मुंबई पोलीस वेबसाईटवरील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

गेल्या शुक्रवारी साकीनाका येथील 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिचा खून झाल्याने मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय महिला आयोग व राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोगाच्या सदस्यांनी रविवारी बळी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली.

विशेष म्हणजे 550 घटनांपैकी 323 घटनांमधील आरोपी हे अल्पवयीन (18 वर्षांच्या आतील) असल्याचे यासंदर्भातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी 303 आरोपींना गजाआड करण्यात आले असून महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी 142 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान बलात्काराच्या 766 घटना घडल्या असून यात 658 आरोपींना अटक केल्याचे पोलीस अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. यापैकी 445 जण अल्पवयीन असून 321 जण 18 वर्षांवरील आरोपी आहेत. यातील 419 अल्पवयीन व 18 वर्षांवरील 239 आरोपींना अटक करण्यात आले आहे.

2019 साली भादंवि कलम 376 अंतर्गत (बलात्कार) 1015 गुन्ह्यांची नोंद झाली असून यातील 931 घटनांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

याचवेळी 2021, 2020 व 2019 यावर्षी शहरात अनुक्रमे 1100, 1943 व 2678 इतक्या महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या असून यात अनुक्रमे 860, 1539 व 2277 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news