

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३.५५ पर्यंत दुरुस्ती करण्यात येणार असल्याने धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. यामुळे प्रवासी जलद मार्गावरुन प्रवास करु शकतात.
हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. याकाळात पनवेल ते वाशी लोकल बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे. वाशी ते पनवेल दरम्यानचे प्रवासी एसटी, नवी मुंबई महानगर पालिकेच्या बसने वाशी स्थानकापर्यंत प्रवास करुन पुढे लोकलने वडाळा, सीएसएमटीपर्यंत जाऊ शकतात.
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपार ३ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्या येणार आहे. या दरम्यान जल मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरु होणार आहे. काही बोरिवली लोक गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील त काही लोकल रद्द केल्या आहेत. पश्चि रेल्वे मार्गावरील प्रवासी धिम्य मार्गावरुन प्रवास करु शकतात सीएसएमटी ते बांद्रा, गोरेगाव लोक वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.
उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन दररोज तीन हजारांपेक्षा जास्त लोकल आणि सुमारे १०० पेक्षा अधिक मेल-एक्सप्रेस धावतात. यामुळे रेल्वे रुळ, ओव्हर हेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची आठवड्यातून एकदा देखभाल-दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्यासाठी दर रविवारी उपनगरीय रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येतो.