मुंबई : मराठी माध्यमाच्या १० वर्षांत १३३ शाळा बंद!

मुंबई : मराठी माध्यमाच्या १० वर्षांत १३३ शाळा बंद!
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या 130 शाळा गेल्या दहा वर्षांत बंद पडल्या. त्यामुळे विद्यार्थी संख्या ही तब्बल 69 हजारांनी घटली आहे. सध्या मुंबईत 280 मराठी माध्यमाच्या शाळा सुरू असून यात अवघे 33 हजार 114 विद्यार्थी शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे येणार्‍या दहा वषार्र्ंत मराठी शाळा पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिका मराठीसह हिंदी, उर्दू, गुजराती, तामिळ, तेलगू, कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवते. अलीकडेच सीबीएससी बोर्डाच्याही शाळा खासगी सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे चार दशकांपूर्वी मुंबई पालिकेच्या मराठी शाळा विद्यार्थ्यांनी खचाखच भरून जात असत. मुंबई शहरातील आजी-माजी आमदार व खासदार यांच्यासह अनेक नगरसेवक एवढेच काय तर, शासकीय व अशासकीय कार्यालयात वरिष्ठ पदावर कार्यरत असलल्या अधिकार्‍यांनीही महापालिका शाळेत शिक्षण घेतले आहे. सुमारे तीन ते चार दशकांपूर्वी महापालिकेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या सुमारे अडीच लाखापेक्षा जास्त होती. 2010-11 पर्यंत मराठी शाळांमध्ये तब्बल 1 लाख 2 हजार 214 विद्यार्थी होते. मात्र त्यानंतर मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती होऊ लागली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने मराठी शाळा बंद होत गेल्या. 2010-11 ते 2011-12 या शैक्षणिक वर्षांमध्ये 17 मराठी शाळा बंद पडल्या.

गेल्या दहा वर्षात विद्यार्थी पटसंख्या 69 हजाराने घसरल्यामुळे पालिकेला तब्बल 133 मराठी शाळा बंद कराव्या लागल्या. सध्या मराठी  133 शाळा सुरू आहेत. पण विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी घटत असल्यामुळे येणार्‍या दहा वर्षांत मराठी शाळा चालवण्यासाठी विद्यार्थी उपलब्ध होणार नाही, अशी भीती पालिकेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त केली. दरम्यान हिंदी माध्यमाच्या शाळांची संख्या अवघी 227 असतानाही येथे तब्बल 63 हजार 202 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर उर्दू शाळांची संख्या 193 असतानाही येथे 62 हजार 516 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

मराठी माणसांचा इंग्रजी माध्यमांकडे कल !

मुंबईसारख्या शहरात गेल्या काही वर्षांत मराठी कुटुंबांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल दिसून येत आहे. अगदी झोपडपट्टीमध्ये राहणारा पालकही आपल्या विद्यार्थ्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतो. त्यामुळे सहाजिकच महापालिकेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी घसरत असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news