मालदीवच्या पाण्याला सनीने लावली आग
Latest
मालदीवच्या पाण्याला सनीने लावली आग
नवी दिल्ली : बॉलीवूड अॅक्ट्रेस सनी लिओनी पुन्हा एकदा आपल्या बोल्ड फोटो शूटवरून चर्चेत आली आहे. सध्या ही अभिनेत्री मालदीवमध्ये असून रोज आपल्या चाहत्यांसाठी अतिशय हॉट फोटो शेअर करत आहे. ही छायाचित्रे इंटरनेटवर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत.
मालदीवमधील समुद्राकाठी रेड बिकिनीत अतिशय हॉट पोज देत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे. ही हॉट छायाचित्रे शेअर करताना सनीने लिहिले आहे की, माझ्या अनेक छायाचित्रांपैकी आवडलेले कोणते? मी माझे आवडते छायाचित्र नंतर शेअर करणार आहे. सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलावयाचे झाल्यास तिची अनामिका नामक वेबसीरिज नुकतीच रीलिज झाली असून यातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक करण्यात येत आहे.

