

मुंबई ; ऑनलाईन : बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित हिची मोहिनी अद्याप ही भारतीय सिने रसिकांवर अबाधित आहे. त्यामुळे ही 'धकधक गर्ल' अद्याप ही अनेकांचे ह्दय धडधडत ठेवते यात शंका नाही.
माधुरीने अलीकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये माधुरी खुप सुंदर दिसत आहे. माधुरीने पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.
माधुरी दीक्षित सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बॉलिवूडची धक धक गर्ल तिच्या स्टाईलने ती आजही लोकांच्या हृदयावर राज्य करते. तिची अप्रतिम फॅशन प्रत्येकाला प्रभावित करत असते.
याचे कारण असे की, ५० वर्षे पार केल्यानंतरही माधुरी दीक्षित असे कपडे निवडते की, तिच्यासमोर २५ वर्षाच्या सुंदरीसुद्धा फिक्या पडतील. माधुरीचा असाच एक लूक पुन्हा समोर आला आहे. ज्यामध्ये माधुरीने खोल गळ्याचे ब्लाउज घालून बोल्ड दिसण्याचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.
माधुरी दीक्षितने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून तिची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. ज्यात ती चमकदार हिरव्या रंगाचा अतिशय अनोखा लेहंगा परिधान करताना दिसत आहे. हा लेहंगा मेटॅलिक स्ट्रक्चर्ड पॉलिमरपासून बनवला गेला आहे. तसेच यासाठी नॉन-स्ट्रेचेबल आणि लाइटवेट फॅब्रिक कापड वापरले गेले आहे. तसेच ओढणी आणि ब्लाउजसाठी ट्यूल आणि ऑर्गेंजा फॅब्रिकचा वापर केला आहे.
माधुरी ने जो हिरव्या रंगाचा लेहंगा घातलेला आहे. त्या लेहंग्याचे डिजाईन भारताचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांनी तयार केले आहे. डिझायनरच्या अधिकृत वेबसाईटवर या लेहंगाची किंमत १,९५,००० रुपये आहे.
या मेटॅलिक स्ट्रक्चर्ड लेहेंगामध्ये हॅँड एम्ब्रॉइडरी केलेले आहे, जे विंग डिझाईन लुकमध्ये होते. तसेच डीप कट नेकलाइन ब्लाउजमुळे तिच्या एकूण लुकमध्ये बोल्डनेसपणा स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे माधुरीचा लूक खुप वेगळा दिसत आहे.
लूक परिपूर्ण करण्यासाठी माधुरीने कोणत्याही प्रकारचे हेवी ऑक्सिडाइज्ड दागिने घातलेले नाहीत. तर या लेहंग्याला सुट करणारे इअररिंग्स कानात घातले आहेत. या लेहंगातील माधुरीचे छायाचित्रे समोर येताच तिचे चाहते मात्र घायाळ झाले आहेत.
वर्क फ्रंटवर माधुरी दीक्षित 'डान्स दीवाने 3' शोला जज्ज करत आहे. याशिवाय ती नेटफ्लिक्सवर 'फाइंडिंग अनामिका' द्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.