महिलांना सर्वाधिक हायपर टेन्शनचा त्रास; ठाणे, पालघर आणि रायगडमधील आरोग्य तपासणीत उघड
अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या योजनेंतर्गत कोकण विभागातील ठाणे, पालघर आणि रायगडमधील १८ वर्षांवरील मुली व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत महिलांमध्ये सर्वाधिक उच्च रक्तदाब अर्थात हायपर टेन्शनचा त्रास अधिक असून त्याखालोखाल मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजारांनी त्रस्तसुद्धा आहेत.
राज्यात माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होत कर्करोगाचे प्रमाण वाढत वाढत असून तरूणी व असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाचे निर्देश होते. असतांना महिलांमध्ये गरोदरपणात रक्तक्षयाचे महिलांमध्ये इतर आजार देखील बळावत
आरोग्य विभागामार्फत १८ वर्षावरील स्त्रियांसाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविण्याचे ठाणे जिल्ह्याच्या तुलनेत पालघर आणि रायगड जिल्ह्यातील महिलांमध्ये हायपर टेन्शनचे प्रमाण अधिक असल्याची बाब आकडेवारीवरून समोर आली आहे.
ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील महिलांच्या आरोग्य तपासणीकडे कुटुंबाकडून अनेकदा दुय्यम स्थान देण्यात येत असते. प्रामुख्याने घरातील स्त्री आरोग्याच्या दृष्टीने सशक्त असेल तर घर सुरक्षित ही संकल्पना घेऊन नवर- त्रोत्सवाच्या काळात सरकारच्या वतीने 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' ही योजना राबविण्यात आली. यामध्ये महिलांची रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्तनांसह गर्भाशयांच्या मुखाचा कॅन्सरची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत सर्वाधिक महिलांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहासह ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे समोर आले आहे. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटीच्या आसपास आहे. पालघरची ३५ लाख ३६ हजार ४७५ आणि रायगडची ३० लाख ८७ हजार ६५१ इतकी आहे. या लोकसंख्येच्या तुलनेत तपासणी केलेल्या महिलांमध्ये विविध आजारांच्या महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे समोर आले आहे. तपासणी करण्यात आलेल्या महिलांमध्ये सर्वाधिक हायपर टेन्शनचा त्रास अधिक असल्याचे समोर आले असून, त्याखालोखाल मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजाराने त्रस्त असल्याच माहिती समोर आली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक हा आजार पालघर आणि रायगडमधील महिलांना असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यातील ४३ हजार महिलांची उच्च रक्तदाबाची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये एक हजार ७०५ महिलांना उच्च रक्तदाबाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्वाधिक रायगडमधील असून सुमारे ११ हजारहून अधिक महिला या आजारातुन जात असल्याचे समोर आले आहे.

