

बोलंगिर : नशा शराब मे होता तो नाचती बोतल, असे शराबी चित्रपटातील गाण्यात गंमतीने म्हटले गेले असले तरी कित्येकदा हेच खरे आहे की काय, असे वाटून जावे, अशी परिस्थिती तयार होते आणि आपण ते पाहून अगदी दंग राहून जातो. त्यातही अशी दंग करून जाणारी मद्यधुंद व्यक्ती जर देशी पिणारी असेल तर मग काय विचारायलाच नको.
ओडिशातील एका छोट्याशा खेड्यात याचा दाखला त्यावेळी मिळाला, ज्यावेळी तेथील एका मद्यधुंद व्यक्ती नशेच्या भरात महामार्गावरील भल्यामोठ्या साईनबोर्डवर चढली आणि भरीस भर म्हणून तेथेच दंडबैठका काढण्यास सुरुवात केली!
ओडिशातील बोलंगिर जिल्ह्यातील या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला गेला आणि त्यानंतर तो पाहता पाहता व्हायरल झाला. आतापर्यंत हा व्हिडीओ 7 लाखांपेक्षा अधिक लोकांनी इन्स्टाग्रामवर पाहिला असून त्यावर भन्नाट प्रतिक्रियाही आल्या आहेत. एक यूजर गंमतीने म्हणाला, इस बेचारे को ये भी नही पता है, जीम कहा है!