

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले अनेक आमदार संपर्क करत आहेत. पण ते तेथे जाऊन अडकले आहेत. अजूनही नजरकैदेत असलेल्या सगळ्यांसाठी दरवाजे खुले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात खरा मुख्यमंत्री कोण हे सगळ्यांना कळलं आहे, असे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
सरकारमध्ये निष्ठेला स्थान नाही. खऱ्या सत्ताधारी पक्षातील चांगले काम करणाऱ्या महिलांना व अपक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. घाणेरडे राजकारण दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेला कळलं असून गद्दार सराकारविरोधात आमचं आंदोलन सुरू आहे. तेथे नजरकैदेत अडकलेल्या अनेक आमदारांच्या मनात दरवाजे खुले आहेत का? असा सवाल आहे. अजूनही सगळ्यांसाठी दरवाजे खुले आहेत. पण ज्यांना तेथेच राहायचे आहे, त्यांनी आमदार पदाचा राजीनामा द्यावा व निवडणुकीला सामोरे यावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.