

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : अमेरिका आणि रशियादरम्यान एक सौदेबाजी झाली. एका आरोपीच्या मोबदल्यात दुसर्या आरोपीला सोडण्याचा करार या दोन्ही देशांत झाला. तो पाळलाही गेला. राशियाच्या ताब्यात असलेल्या अमेरिकन महिला बास्केटबॉलपटू ब्रिटनी ग्राईनर हिच्या सुटकेच्या बदल्यात व्हिक्टर बाऊट या हत्याराच्या सौदागराला सोडण्यात आले.
अबुधाबी विमानतळावर या दोघांची देवाण-घेवाण झाली. ग्राईनरला 17 फेब्रुवारी रोजी मॉस्को विमानतळावर रशियन अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. यानंतर लगेचच युक्रेनविरुद्ध रशियाने युद्ध पुकारले होते. यादरम्यान अमेरिका आणि रशियातील संबंध ताणले गेल्याने ग्राईनर रशियात अडकून पडली होती. ग्राईनर ही समलैंगिक आहे. अमली पदार्थ बाळगण्याच्या आरोपाखाली तिला रशियात अटक झाली होती. दुसरीकडे बाऊट हा हेरगिरीच्या आरोपाखाली 2018 पासून अमेरिकेतील तुरुंगामध्ये कैद होता. बाऊट हा पूर्वी सोव्हियत लष्करामध्ये लेफ्टनंट होता.