

ढाका; वृत्तसंस्था : बांगला देशातील खुलनामध्ये दिल्लीतील श्रद्धा हत्या प्रकरणासारखी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. खुलनामध्ये एका मुस्लिम तरुणाने हिंदू प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर प्रेमिकेच्या मृतदेहाचे तीन तुकडे करून त्यांना नाल्यामध्ये टाकले आहे. बांगला देश पोस्ट वृत्तानुसार ही घटना 7 नोव्हेंबरची आहे.
आरोपी अबू बकर असे त्या तरुणाचे नाव असून त्याचे लग्न झाले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून गेल्या काही दिवसांपासून आम्हा दोघांमध्ये वाद सुरू असून त्यातून संतप्त होऊन प्रेयसीची हत्या केल्याचे अबू बकर याने कबुली दिली आहे. हिंदू तरुणी व अबू बकर हे रिलेशनशिपमध्ये होते. प्रियसीला अबू बकर याचे लग्न झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्यात भांडणे सुरू झाली. त्यातून निराश होत अबू बकरने प्रेयसीची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. डोके, हात आणि शरीर वेगवेगळ्या बॅगेत भरले आणि त्यानंतर त्या बॅगा नाल्यांमध्ये टाकल्याचे पोलिसांनी सांगितले.