फायब्रोमायल्जिया आजाराची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपचार

फायब्रोमायल्जिया आजाराची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपचार
Published on
Updated on

'फायब्रोमायल्जिया' हे एक मस्क्युलर स्केलेटल पेनफुल डिसिज आहे. या आजारात संपूर्ण शरीरात अंगदुखी राहते. या आजारामागे अनेक कारणे असू शकतात.

फायब्रोमायल्जिया हा एक सर्वत्र दिसून येणारा आजार असून तो कोणालाही होऊ शकतो. एका आकडेवारीनुसार, सुमारे अडीच टक्के लोकांना या आजाराचा त्रास होतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना त्याचा त्रास अधिक होतो. हा आजार अनुवांशिकतेने देखील बळावू शकतो. या आजारात स्नायूंचे दुखणे बळावते.

शरीरातील पेन थ्रेशोल्ड कमी होतो आणि या कारणांमुळेही त्यास सेंट्रल पेन एंज्लिफिकेशन डिसऑर्डर देखील म्हटले जाते. या कारणांमुळे अंगदुखी ही अधिक तीव्र होत जाते. मेंदूत पेन रिसेप्टर्स असतात आणि ते नर्व्हसमधील न्यूरोट्रान्समीटरच्या स्टीम्यूलेटपासून सक्रिय होतात. या कारणामुळेही शरीरात दुखणे वाढते. अनेकदा रुग्णाला एवढा त्रास होतो की, दुखणे नेमके कोठे आहे, हे देखील लवकर सांगता येत नाही.

प्रमुख लक्षणे :

संपूर्ण शरीराच्या स्नायूत खूप अधिक दुखणे

हात आणि पाय सुन्न पडणे किंवा मुंग्या येणे

अशक्तपणा आणि थकवा जाणवणे

खूप अधिक सेन्सिटिव्ह होणे. म्हणजेच कोणी हलका धक्का दिला तरी त्रास होणे

कोणत्याही गोष्टीवरून विचार करत राहणे. त्यामुळे रात्री चांगली झोप न येणे

डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास

चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे

एकाग्रता नसणे किंवा स्मरणशक्ती कमी होणे

अपचन

हीट, कोल्ड, लाइट आणि आवाजावरून अधिक संवेदनशील राहणे.

चिंताग्रस्त किंवा नैराश्य येणे

आजाराची कारणे :

कौटुंबिक पार्श्वभूमी, अपुरी झोप, अ‍ॅसिडिटी किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजेच पचनशक्ती बिघडणे, महिलांतील हार्मोनल असंतुलन, फूड डिसऑर्डर, इलेक्ट्रोलाइट असंतुलन, मूड बिघडणे, आर्थरायटिस, ऑटो इम्यून क्रॉनिक डिसिज किंवा व्हायरल इंन्फेक्शन, शारीरिक हालचाली मंदावणे, शारीरिक, मानसिक, भावनात्मक स्ट्रेस वाढणे. या कारणामुळे सतत विचार करणे, अपघात किंवा फिजिकल ट्रामानंतर स्ट्रेस वाढणे.

उपचार : अनुवांशिकता किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीचे आकलन केल्यानंतर रुग्णाची होल बॉडी चेकअप केली जाते. रक्ताच्या चाचण्या, यूरिक अ‍ॅसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन डीची पातळी तपासली जाते. यासाठी अमेरिकी कॉलेज ऑफ रुमेटोलॉजीने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. शरीरातील 18 टेंडर पॉईंटची माहिती दिली आहे. यात 11 पॉईंटसपेक्षा अधिक भागात त्रास होत असेल तर त्यास 'फायब्रोमायल्जिया' असे म्हणता येईल.

फायब्रोमायल्जियावरील उपचार सिंप्टोमॅटिक आणि मल्टीफोकलने केले जातात. यासाठी त्याच्या आजाराचे मूळ शोधण्यात येते. रुग्णाच्या तब्येतीनुसार सिंप्टोमॅटिक मेडिसिन देण्यात येते आणि त्रास कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे, स्नायूचे दुखणे कमी करण्यासाठीचे औषधे, अँटी डिप्रेसेंट, मूड चेंजर औषधी दिली जातात.

शरीरात दुखणार्‍या टेंडर पॉईंटवर कायरोप्रेक्टर, अ‍ॅक्यूप्रेशर आणि अ‍ॅक्युपंक्चर थेरेपी देखील करता येईल. ट्रिगर पॉईंटवर नोडसचे वेदनाशामक मसाज किंवा स्ट्रेचिंग, बॉल मसाज, फोम रोलर केल्यानंतरही आराम मिळतो.रिलॅक्सेशन थेरेपीत दुखण्याच्या ठिकाणी हिटिंग पॅड किंवा आईस पॅक लावल्यामुळे आराम मिळतो.

रुग्णाला नियमित रूपाने एरोबिक एक्सरसाईज, मेडिटेशन, योग, ब्रीदिंग एक्सरसाईज, वॉकिंग केल्याने फायदा मिळतो. यामुळे शरीरातील मॅकेनिझम व्यवस्थित राहते. स्ट्रेस कमी राहतो आणि रुग्णाला आराम मिळतो. गरज भासल्यास फिजिओथेरेपीचा आधार देखील घेतला जातो.

स्ट्रेसफुल अ‍ॅक्टिव्हिटीजवरील नियंत्रणासाठी ऑक्यूपेशनल थेरेपी, कॉग्निटिव्ह बिहेव्हियरल थेरेपी, कौन्सिलिंगची मदत घेतली जाते.
दररोज सात ते आठ तास चांगली झोप घेणे गरजेचे आहे.

बॅलेन्स डायट गरजेचे आहे. घरात तयार केलेले पोषक तत्त्वयुक्त भोजन करायला हवे. तेलकट, तूपकट, मसालेदार, प्रोसेस्ड फूड टाळायला हवेत. कॅफिनचे इनटेक कमी करणे आवश्यक आहे.

सकारात्मक विचार ठेवा. गरज भासल्यास आपल्या कुटुंबातील सदस्यांशी, मित्राशी आणि नातेवाईकांशी बोलत राहा. याआधारावर ताण कमी राहील.

डॉ. प्राजक्ता पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news