प्रियकराच्या मदतीने पतीचा ‘द़ृश्यम’ स्टाईल खून

प्रियकराच्या मदतीने पतीचा ‘द़ृश्यम’ स्टाईल खून
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या सेप्टिक टँकमध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचा मृतदेह टाकून 'द़ृश्यम' स्टाईल खून करणार्‍या पत्नीचे बिंग अखेर फुटले. देशाच्या राजधानीतील ग्रेटर नोएडामध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेत सुदैवाने 'द़ृश्यम'प्रमाणे नियतीने खुन्याचा नव्हे तर पोलिसांच्या बाजूने कौल दिला आहे.

ग्रेटर नोएडातील सतीश पाल हा नोकरदार युवक पत्नी नितू आणि मुलासोबत राहत होता. सतीशच्या पत्नीचे बांधकाम मिस्त्रीसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. सतीशला हे समजले तेव्हा त्याचे पत्नीशी भांडण झाले. नंतर नितूने सतीशचा काटा काढण्याचे ठरविले. सतीशला 2 जानेवारी रोजी गोडीगुलाबीत घेऊन तिने झोपेच्या गोळ्या मिसळून दारू पाजली. नंतर प्रियकर मेसन आणि त्याचा साथीदार गौरव यांना घरी बोलावून त्यांच्यासोबत मिळून गळा आवळून सतीशचा खून केला. मृतदेह शेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सेप्टिक टँकमध्ये टाकून त्यावर जाडसर लेंटर टाकले.

भावाने दिली बेपत्ता झाल्याची तक्रार

आठवडाभर सतीशशी बोलणे नाही म्हटल्यावर त्याच्या भावाने 10 जानेवारी रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पत्नी नीतूवर पोलिसांचा संशय बळावला. अखेर पाच दिवसांनी सारे सत्य समोर आले. नितूसह प्रियकर मिस्त्री हरपाल यालाही अटक झाली. पोलिसांच्या उपस्थितीत मजुरांनी सुमारे पाच तास लेंटेन फोडले. सतीशचा मृतदेह सेप्टिक टँकमधून बाहेर काढण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news