

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पॅन कार्ड आणि आधार कार्ड परस्परांशी लिंक न केल्यास 31 मार्चनंत पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. प्राप्तिकर विभागाने पॅनधारकांना मार्च 2023 अखेरपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केलेले आहे. ज्यांनी कुणी अद्याप पॅन आधारशी लिंक केलेले नाही, त्यांनी फार काळजी करण्याचे कारण नाही. कारण, ऑनलाईन, एसएमएसद्वारे घरबसल्या पॅन आधारशी लिंक करणे सोपे आहे. तेव्हा आजच लिंक करून मोकळे व्हा. सवलतीच्या श्रेणीत न मोडणार्या सर्व पॅनधारकांसाठी आधार लिंक करणे आयटी अधिनियमानुसारही आवश्यक आहे.